Friday, 17 January 2020

माझा भारत महान ....... इस्रो team चे अभिनंदन

                            माझा भारत महान
भारत देश म्हणजे 
विविध भाषा 
विविध धर्म विविधतेत एकता 
विविध रंग
जुन्या परंपरा  
विज्ञान तंत्रज्ञान 
 विविध खेळ आणि बदलता भारत 
                                                                        हि झाली भारताची विशेषणे 
तर हे सर्व सांगायचं कारण हि तसचं आहे भारतीय प्रजासत्ताक दिन येतोय......आणि आपली मान उंचावणारी गोष्ट जी आपल्या इस्रो च्या  संशोधकांनी केली GSAT 30 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण हे होय. त्या संदर्भातील हा लेख !!!आपण पाहतोच आहे. भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. आणि त्यात आणखी भर म्हणजे जिओ ने आणलेल्या स्कीमस ठराविक रक्कम भरा महिनाभर किवा ३ महिने नेट फ्री.... बस मग फ्री असेल तर काय बघायच ! आणि  या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात क्रांती घडून येईल. आता 4 जी सुरु आहे भारत भर या उपग्रहामुळे 5 G देखील लवकरच येईल. भारतात फ्री इंटरनेट या चौकटीतील  वापरर्कर्ते  कोट्यावधी आहेत. म्हणजे डाटा  संपला  पाहिजे दिवसाला १ जीबी असेल किवा  २ जीबी नाही संपला तर खूप नुकसान होईल. ह्या विचार सरणी असलेले.आजची तरूणाई यात जास्त अडकलेली दिसून येते. थोडक्यात सांगायचे तर व्यसन या बद्दल बोलूच पण जी क्रांती घडून येणार आहे. ती कशी घडली याबद्दल
या लेखातून जाणून घेऊयात...

अखेर तो क्षण कसा होता हे पहा पुढील लिंक वर ISRO ची यशस्वी कामगिरी या नावावर क्लिक करा.पहा तो अतुलनीय क्षण...लोकसत्ता वृत्तपत्राचा हा सविस्तर रिपोर्ट 
हा लेख लोकसत्ता या वृत्तपत्रातील आहे . 
   संकलन: श्री.सौरभ काकडे                       
       View image on Twitter  इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आणखी एक यशस्वी कामगिरी केली आहे. जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून यशस्वी प्रेक्षेपण केले आहे. आज, शुक्रवारी पहाटे दोन वाजून ३५ मिनिटांनी उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षेपण केले. GSAT-30 या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात नवी क्रांत्री होणार आहे. या उपग्रहामुळे इंटरनेट आधिक गतीने चालणार आहे.यापूर्वी २०१५ मध्ये इनसॅट-४ए हा उपग्रह लाँच करण्यात आला होता. त्याची मर्यादा संपुष्टात आली असून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे GSAT-30 हा दुरसंचार उपग्रह इस्रोनं लॉन्च केला आहे. जीसॅट-३० हा उपग्रह इनसॅट-४एच्या जागी काम करेल.
काय होणार फायदा –
GSAT-30 हा दुरसंचार उपग्रहामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं भाकितही वर्तवण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.View image on Twitter

Thursday, 16 January 2020

सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षा (सेट परीक्षा २०२०)

               सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि यु. जी. सी., नवी दिल्ली मान्यताप्राप्त
नोडल एजन्सी आयोजित



३६ व्या सेट परीक्षेची तारीख                      रविवार दि. २१ जून २०२०                              
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत    ०१ जानेवारी २०२० ते २१ जानेवारी २०२० 

सेट परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासंबंधीची व या परीक्षेची संपूर्ण माहिती  (http://setexam.unipune.ac.in/Login.aspx) या संकेतस्थळावर दि. २६-१२-२०१९ पासून उपलब्ध होईल. 
UGC सेट परीक्षेचा अभ्यासक्रम- सर्व विषय अभ्यासक्रम व
परीक्षेसाठी महत्वाचे परीक्षेची योजना    व   विद्याशाखा आणि विषय या नावावर क्लिक केल्यास बघता येईल




 जाहिरात क्र. ६७                                                                                                                                                                                                                                                  कुलसचिव
दि. २५-१२-२०१९                                                                                             डॉ. प्रफुल्ल पवार
                          

Sunday, 29 December 2019


समाजगीत

जनकल्याणी देह झिजवूनी लाजविले चंदना
कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना
तुम्हाला लाख लाख वंदना          ||धृ.||
ऋषिराजाने राजर्षी लावियली ज्योत
वसा ज्योतीचा घेऊनी साचा पेटविला पोत
दिशादिशांतून घराघरांतून आली नवजाग
दिसू लागला मनामनातला मुक्तीचा मार्ग

निद्रेतच होते दंग
अंतरातले स्फुर्लिंग
ते उठले उधळीत रंग

बहुजन हितायबहुजन सुखाय चेतविली चेतना
कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना   ||||

नांगर टाका भाला फेका शिकवी शिवराया
त्याच मातीवर कसुनी कंबर करुया नव किमया
निरलस श्रमुनी काढू खणूनी रुतलेली शल्ये
निष्ठा शिंपून करु पेरणी हवी नवी मूल्ये

दृढ निश्चय ऐसा करुनी
कार्यात प्राण ओतुनी
आयुष्य दिले झोकुनी
ज्ञानप्रशाला उभारण्याला दिलीत हो प्रेरणा
कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना     ||||

मूक अडाणी फुलवू अग्रणी त्यातूनी ही जिद्द
मुळात अबला करु या सबला धन्य धन्य ब्रीद
दिव्य थोरवी कुठली ओवी गुंफावी गौरवा
नम्रपणाने एक मागणे हट्ट हाच पुरवा
निरपेक्ष अपुली  कृती
ती सेवाभावी मती ती
निष्ठा तसली ध्रुती
समाजदिन हा सार्थ कराया द्या हो द्या प्रेरणा
कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना      ||||
                    
                                 - कै.प्रा. श्रीरंग गुणे   









         

Monday, 23 December 2019

Friday, 20 December 2019

।।श्री स्वामी समर्थ।।


                              ।।श्री स्वामी समर्थ।।

        
'

 श्री स्वामी समर्थ' चा नेमका अर्थ काय ?_*
षडाक्षरी स्वामी नाम 'श्री स्वामी समर्थ' हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रम्हाण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुचरित्र हे ज्याप्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याच प्रमाणे समानार्थी 'श्री स्वामी समर्थ' हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे. ह्या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे अंतरीक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातुन सहजच होते. असा आमचा अनुभव आहे. या तारक मंत्राचा मतीतार्थ व्यवस्थित समजुन घेऊन त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यययोग सर्व साधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व आधिक प्रभावकारक होत असतो.
श्री स्वामीं समर्थ या सद्गुरु ब्रम्हवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा मतीतार्थ खालीलप्रमाणे आहे.


                          श्री स्वामी समर्थ 
श्री  स्वयं श्रीपदाविराजीत सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज...!

स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्म समर्पित करणे असा आहे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईच्छ्या...! अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा.

समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा...!
त्यायोगे 'श्री स्वामी समर्थ' म्हणजे श्रीपदविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करुन स्वयंभु शिव तत्व सद्गुरुकृपे अंकित करा.

Thursday, 31 October 2019

भगतसिंह यांनी लिहिलेली कविता 
                                                      हिंद के बहादुरों ........ 
                हिंद के बहादुरों, वक्त की पुकार  हैं 
     बढ़ाना हे, बढ़ाना हे 
      आगे सबसे बढ़ाना हैं l
दिलो में जलती आग हैं
हथेलियो पे जान हे l
हौसले बुलंद  हैं,
गगन छुनेवाले   हैं l
आंधियाँ चले बिजलियाँ गिरे
 हनुमान की छलांग लेके, वीर बनके चलाना हैl

 हिंद के बहादुरों .....

हम हैं दूत शांति के
 विश्व को बताना है 
जंगखोर हम नही 
अतीत भी गवाह है 
ये बुद्ध की धरा, ये गान्धी की धरा 
निति धर्म कर्म योग आज हमको लाना है 

  हिंद के बहादुरों .....