Friday, 17 January 2020

माझा भारत महान ....... इस्रो team चे अभिनंदन

                            माझा भारत महान
भारत देश म्हणजे 
विविध भाषा 
विविध धर्म विविधतेत एकता 
विविध रंग
जुन्या परंपरा  
विज्ञान तंत्रज्ञान 
 विविध खेळ आणि बदलता भारत 
                                                                        हि झाली भारताची विशेषणे 
तर हे सर्व सांगायचं कारण हि तसचं आहे भारतीय प्रजासत्ताक दिन येतोय......आणि आपली मान उंचावणारी गोष्ट जी आपल्या इस्रो च्या  संशोधकांनी केली GSAT 30 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण हे होय. त्या संदर्भातील हा लेख !!!आपण पाहतोच आहे. भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. आणि त्यात आणखी भर म्हणजे जिओ ने आणलेल्या स्कीमस ठराविक रक्कम भरा महिनाभर किवा ३ महिने नेट फ्री.... बस मग फ्री असेल तर काय बघायच ! आणि  या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात क्रांती घडून येईल. आता 4 जी सुरु आहे भारत भर या उपग्रहामुळे 5 G देखील लवकरच येईल. भारतात फ्री इंटरनेट या चौकटीतील  वापरर्कर्ते  कोट्यावधी आहेत. म्हणजे डाटा  संपला  पाहिजे दिवसाला १ जीबी असेल किवा  २ जीबी नाही संपला तर खूप नुकसान होईल. ह्या विचार सरणी असलेले.आजची तरूणाई यात जास्त अडकलेली दिसून येते. थोडक्यात सांगायचे तर व्यसन या बद्दल बोलूच पण जी क्रांती घडून येणार आहे. ती कशी घडली याबद्दल
या लेखातून जाणून घेऊयात...

अखेर तो क्षण कसा होता हे पहा पुढील लिंक वर ISRO ची यशस्वी कामगिरी या नावावर क्लिक करा.पहा तो अतुलनीय क्षण...लोकसत्ता वृत्तपत्राचा हा सविस्तर रिपोर्ट 
हा लेख लोकसत्ता या वृत्तपत्रातील आहे . 
   संकलन: श्री.सौरभ काकडे                       
       View image on Twitter  इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आणखी एक यशस्वी कामगिरी केली आहे. जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून यशस्वी प्रेक्षेपण केले आहे. आज, शुक्रवारी पहाटे दोन वाजून ३५ मिनिटांनी उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षेपण केले. GSAT-30 या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात नवी क्रांत्री होणार आहे. या उपग्रहामुळे इंटरनेट आधिक गतीने चालणार आहे.यापूर्वी २०१५ मध्ये इनसॅट-४ए हा उपग्रह लाँच करण्यात आला होता. त्याची मर्यादा संपुष्टात आली असून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे GSAT-30 हा दुरसंचार उपग्रह इस्रोनं लॉन्च केला आहे. जीसॅट-३० हा उपग्रह इनसॅट-४एच्या जागी काम करेल.
काय होणार फायदा –
GSAT-30 हा दुरसंचार उपग्रहामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं भाकितही वर्तवण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.View image on Twitter

No comments:

Post a Comment

नमस्कार ज्ञानामृत या ब्लॉग संदर्भात आपल्या अभिक्रिया काही सूचना असतील नक्की कळवा. आमचा ब्लॉग आवडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीना जरूर सांगा
ब्लॉग ला SUBSCRIBE आणि share जरूर करा धन्यवाद