सूर्यग्रहण
                         
खग्रास सूर्यग्रहण
जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातोतेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेससूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात. यांचा आकार वर्तुळाकार असतो. त्यामुळे या किरणांना तेजोवलय (Corona) असे म्हणतात.

खंडग्रास सूर्यग्रहण

जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातोतेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
कंकणाकृती सूर्यग्रहण
जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते. ह्या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे दिसते.


दिनांक २६/१२/२०१९ रोजी गुरुवारी  कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून पाहता येणार
शके १९४१ रोजी गुरुवारी २६ डिसेंबर २०१९... मार्गशीर्ष कृष्ण आमवस्या ग्रहण काल माहिती
स्पर्श सकाळी:- ०८:०४ मी ग्रहण आरंभ ग्रहण  सकाळी ०९:२२ मी ग्रहण ग्रहण
मोक्ष  सकाळी १०:५५ मी ग्रहण समाप्त पर्व ०२:५१ मी ग्रहण वेध काल माहिती शके १९४१ रोजी बुधवारी
२५ डिसेंबर २०१९... मार्गशीर्ष कृष्ण आमवस्या २५ डिसेंबरच्या सूर्यास्तापासून आरंभ
ग्रहाणाचा वेध   हे ग्रहण दिवसाच्या पहिल्या प्रहरात असल्याने बुधवारी २५ डिसेंबरच्या सूर्यास्तापासून २६ डिसेंबर ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. बाल,वृध्दआजारी,अशा व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी रात्री १२ पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेदामध्ये भोजन करू नये. स्नान,जप,नित्यकर्मदेवपूजा,श्राद्ध कर्म ही करता येतात. वेधकाळात आवश्यक असे पाणी पिणेमलमूत्रोत्सर्ग,झोप,इ. कर्मे करता येतात. ग्रहणपर्वकाळात म्हणजेच सकाळी ०८|०४ ते १०|५५ या कालावधीत पाणी पिणेमलमूत्रोत्सर्गझोप इत्यादी कर्मे करणे करू नये.
ग्रहण दिसणारे प्रदेश  भारतासह संपूर्ण आशियाखंड आफ्रिकाखंडातील इथिओपिया व केनिया आणि ऑस्ट्रेलियाचा उत्तरेकडील प्रदेश या प्रदेशात ग्रहण दिसणार आहे.
केरळ,तामिळनाडू इत्यादी प्रदेशात कंकणाकृति अवस्था पहावयास मिळेल उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे ग्रहण खंडग्रास दिसेल. पुण्यकाल / पर्वकाल ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ पुण्यकाल मानावा. खगोलीय घटनांमध्ये दुर्मीळ समजले जाणारे कंकणाकृती सूर्यग्रहण एक महिन्याने गुरुवार२६ डिसेंबर रोजी भारतातून दिसणार आहे. यापूर्वी१५ जानेवारी २०१० रोजी नऊ वर्षांपूर्वी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती. २६ डिसेंबरला होणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातील कर्नाटककेरळ तामिळनाडू येथील काहीभागांतून दिसेल. उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसेलअसे खगोल अभ्यासकपंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. सोमण म्हणाले कीखग्रास सूर्यग्रहणात चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकते.परंतु जर त्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडा आपल्याला दिसतेत्यालाच 'कंकणाकृती सूर्यग्रहणम्हणतात. अक्षरश: 'फायर रिंग'चे दर्शन आपल्याला होते. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी न पाहता चष्म्याचा वापर करावाअसे ते म्हणाले. मुंबई येथे सकाळी ८.०४ ते १०.५५ या वेळेत तरपुणे येथून ८.०५ ते १०.५८ या वेळेत हे ग्रहण दिसेल. यानंतर पुढच्या वर्षी २१ जून २०२० रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती राजस्थानपंजाबहरयाणा आणि उत्तराखंडमधील काही प्रदेशातून दिसणार आहे. खंडग्रास स्थितीची वेळ प्रत्येक ठिकाणी वेगळी असणार आहे. गुरुवार२६ डिसेंबर रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती कर्नाटकतामिळनाडू आणि केरळ या तीन राज्यांतील काही भागांतून दिसणार आहे. यामध्ये कोइम्बतूरधरमपूरमदिंडीगुलएरोडेकान्हनगडकन्नूरकरूरकोझिकोडेमदेकेरीमंगलोरमंजेरीउटीफाल्लकडपायन्नूरपोलचीपुडुकोटललिरूचीपल्लीतिरुपूर इत्यादी ठिकाणे आहेत. साधारणत: दोन ते तीन मिनिटे खग्रास स्थिती तेथून दिसणार आहे. उर्वरित भारतातून या सूर्यग्रहणाची खंडग्रास स्थिती वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे.

वेधातील नियम काय आहे?

  • 1.       भोजन करू नयेग्रहण स्पर्श ते मोक्ष  काळात मल- मूत्र विसर्जन,
  • 2.       भोजनअभ्यंगस्नान,झोपकाम
  • 3.       विषयक सेवन शक्यतो टाळावे.
  • 4.       नदीत स्नान शुभ मानले जाते. यथा
  • 5.       शक्ती स्नान कुठच्याही नदीत गंगा
  • 6.       समजून करावी.मोक्षा नंतर च स्नान करावे.
  • 7.       ग्रहण कालावधीत काय करावे?
  • 8.   स्नान,दान,होम,तर्पण,श्राद्ध,मंत्र पुर्शचरण करावे .,ग्रहण लागण्याच्या सुरूवातीलाच दर्भ व तुळशीपत्र वापरले तर दोष लागणार नाहीत.

ग्रहणाबाबतीत बरेच गैरसमजुती आहेत.
  1. ग्रहण लागताच वेध लागते.त्यामुळे काहीच करु नये. हे खरेही आहे म्हणून काय करावे काय करु नये हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो.
  2.   ग्रहणात स्नान करुन पुजा,पाठ करावेत,मंत्र जप करावा.
  3.   ग्रहण काळात झोपू नये
  4.   घराची साफ सफाई करू नये.
  5. गर्भवती स्त्रियांनी  देवाची उपासना करावी.जप करावा.घरातून बाहेर जाऊ नये.व ग्रहण काळी काहीही खाऊ नये.नाहीतर बाळाला शारीरिक त्रास होतो.
  6. ग्रहण संपल्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे त्यानंतर काहीतरी गोड बनवून देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे.
  7.  ग्रहणकाळात कोणाशीही भांडण करु नका.शांत रहा,ध्यान करा,गप्प बसा
  8. ग्रहणकाळात झोपू नका नाहीतर रोग पकडतो.
  9.  ग्रहणकाळात लघुशंकालघवी करु नये,घरात दरिद्रता येते.सावध रहा.
  10. ग्रहणकाळात जो शौचास जातो त्यास पोटाचे विकार होतात.
  11.  ग्रहणकाळात संभोग करु नये.नाहीतर डुक्कराच्या योनीत जन्म येतो.
  12.  ग्रहणकाळात चोरीफसवणे,करु नका नाहीतर सर्पयोनीत जन्म घ्यावा लागेल.
  13.  ग्रहणकाळात जीवजंतू व कोणाची हत्या करु नका.नाहीतर अनेक योनींत भटकावे लागेल.
  14.  ग्रहणकाळात भोजन,माॅलीश करु नका,नाहीतर अनेक रोग शरीराला जखडतील.
  15.  ग्रहणकाळात मौन पाळा,जप करा,ध्यान करा.याचे फल लाख पटीने आहे.
  16.  ग्रहणकाळात सर्व कामे सोडून मौन व जप करा हे फार महत्त्वाचे आहे.
  17. सत्य ग्रहणशक्ती अगोदर खावून-पिऊन घ्यावे पण बाथरूम ला जावे लागेल असे घेऊ नये.
  18.  नशापाणी,घाणेरडे वागणे करु नये.स्वैयपाक करु नये.धुने धुवू नये.पाणी भरु नये,
  19.  भगवान  ग्रहणकाळात भ्रूमध्यामध्ये ध्यान करावे.मुले बुद्धिमान होतात.

ग्रहणकाळात काय करावे काय करु नये ही माहिती मी दिली आहे. ही लक्षात ठेवा. हे सर्व शास्त्र परिहार आहे. यातून कोणतीही सूट नाही.
ग्रहण होते म्हणजे नेमके काय होते?
सूर्य या तार्‍याभोवती फिरणार्‍या पृथ्वी या ग्रहाभोवती तिचा चंद्र हा उपग्रहही फिरत असतो. या सर्वाच्या भ्रमण पातळ्या वेगवेगळ्या आहेत. फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येऊन त्याची सावली पृथ्वीवर पडते. ती ज्या भागात पडते तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्या सारखे दिसते. ते सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले तर खग्रास चंद्रग्रहण  आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले गेले तर ते खंडग्रास चंद्रग्रहण होय. अशी स्थिती येणे फक्त अमावास्येलाच शक्य असते. सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आलीतर तिची सावली चंद्रावर पडते व चंद्राचे तेज कमी होते. त्यावेळी चंद्र तांबूस-भुरकट रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर ते खग्रास चंद्रग्रहण घडते. चंद्राच्या काही भागांवर पृथ्वीछाया पडली तर ते खंडग्रास चंद्रग्रहण असते. असा चंद्रग्रहण योग फक्त पौर्णिमेलाच येऊ शकतो.

राहू व केतू म्हणजे काय?
पृथ्वीकक्षेचे प्रतल ( पातळी ) व चंद्रकक्षेचे प्रतल हे वेगवेगळ्या प्रतलात आहेत. त्या प्रतलांच्या छेदन बिंदूंना राहू व केतू म्हणतात. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी उत्तरेकडे जाते तो पातबिंदू राहू होय. याउलट चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी दक्षिणेस जाते तो बिंदू केतू होय. ज्या अमावास्येला-पौर्णिमेला चंद्र राहू अथवा केतू बिंदूजवळ असेल तेव्हाच ग्रहण घडू शकते. राहू व केतू हे पातबिंदू एकमेकांच्या बरोबर विरुद्ध अंगाला म्हणजे एकमेकांपासून १८० अंशावर असतात.
दर अमावस्या-पौर्णिमेला सूर्य-चंद्र ग्रहण का होत नाहीत?
अमावास्येला पृथ्वीसापेक्ष सूर्य व चंद्र एकाच दिशेला उगवतात. म्हणजेच त्यांच्यातील पूर्व-पश्चिम अंतर सर्वात कमी किंवा शून्य होते. पण भ्रमण कक्षेच्या पातळीतील फरकामुळे त्याचे दक्षिणोत्तर अंतर शिल्लक राहते. ते ज्या वेळा सर्वात कमी किंवा शून्य होते तेव्हाच ग्रहण घडू शकते.
सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण घडते. हे आपण पूर्वी पाहिले आहे. सूर्य व चंद्र पृथ्वीसापेक्ष जरी  पूर्वेलाच किंवा पश्चिमेलाच असेल तर चंद्र सूर्याच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस असेलतर चंद्राची सावली पृथ्वीवर पडणारच नाही. म्हणजे सूर्यग्रहण होणार नाही. चंद्राची छाया पृथ्वीवर न पडता ती उत्तर किंवा दक्षिणेकडून जाईल. अशावेळी पृथ्वीवरून सूर्यग्रहण दिसणारच नाही. अशीच घटना पौर्णिमेला चंद्राबाबत घडते. पृथ्वीची सावली चंद्रावर पडली तरच चंद्रग्रहण होईल. पण त्यासाठी त्यांचे पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर अंतर शून्य किंवा कमीत कमी व्हायला हवे.

No comments:

Post a Comment

नमस्कार ज्ञानामृत या ब्लॉग संदर्भात आपल्या अभिक्रिया काही सूचना असतील नक्की कळवा. आमचा ब्लॉग आवडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीना जरूर सांगा
ब्लॉग ला SUBSCRIBE आणि share जरूर करा धन्यवाद